Stocks News

Stock Market Rupture: शेअर बाजार धडाधड कोसळला; शेवटच्या काही तासातच ‘गेम’ झाला, गुंतवणूकदार हवालदिल

Stock Market Rupture Nowadays 03 Would possibly perhaps 2024: शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, सकाळच्या ऐतिहासिक तेजीनंतर दुपारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी उच्चांकावरून सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये ४०० अंकांची पडझड दिसून आली. बाजाराच्या घसरणीमुळे हेवीवेट स्टॉक्स मोठ्या प्रमाणात कोसळले.

हायलाइट्स:

  • सकाळच्या ऐतिहासिक तेजीनंतर दुपारी शेअर बाजारात मोठी घसरण
  • उच्चांकावरून सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी घसरला
  • बाजाराच्या घसरणीमुळे हेवीवेट स्टॉक्स मोठ्या प्रमाणात कोसळले.
Fragment Market Rupture Updates Nowadays

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारी सकाळच्या विक्रमी तेजीनंतर आता शेअर बाजाराने अचानक यू-टर्न घेतला आहे. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स उच्चांकावरून २ टक्के किंवा १,४३४ अंकांनी घसरला तर निफ्टीने २२,७९४ अंकाच्या उच्चांकी पातळीवर माजली मारली होती, जिथून आता निर्देशांक १.६० टक्के किंवा ४०० अंकांनी घसरला आहे. बाजाराच्या या घसरणीचा सर्वाधिक फटका हेवीवेट शेअर्सना बसला ज्यामध्ये रिलायन्स आणि HDFC शेअर्सचा समावेश आहे.

तेजीनंतर शेअर बाजार कोसळला
देशातील बड्या कंपन्यांचे समभाग घसरल्याने शुक्रवारी शेअर बाजार गडगडला. दुपारी १ वाजता निफ्टी २५० अंकांनी घसरून २२,४०० अंकांवर, तर सेन्सेक्स ९१६ अंकांच्या घसरणीसह ७३,६९५ अंकावर व्यवहार करत होता. तसेच बँक निफ्टी ४७५ अंकांपेक्षा अधिक घसरल्यानंतर ४८,७६५ पातळीवर आला. यादरम्यान, बीएसईच्या ३० समभागांपैकी २८ समभागांमध्ये मोठी घसरण झाली असून बजाज फायनान्सचा शेअर २ टक्क्यांनी वधारला, तर भारती एअरटेलचा शेअर सर्वाधिक २.४२% घसरला.
Adani SEBI Salvage out about: गौतम अदानींना दणका; सेबीने बजावली कारणे दाखवा नोटीस, कारण काय?
बाजाराच्या घसरणीत कोणाला बसला फटका
याशिवाय शेअर बाजारातील हेवीवेट शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत असून यामध्ये देशातील सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये जवळपास ३% घसरण झाली तर एचडीएफसीचे शेअर्सही एक टक्क्याहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे CEAT टायरचा स्टॉक ४.२$, ज्योती लॅब्स ३.६%, ब्लू स्टार स्टॉक ३%, MRF स्टॉक ३%, टाटा ट्रेंट स्टॉक ३% आणि ICICI लोम्बार्ड स्टॉक २.७ टक्क्यांनी घसरला. याशिवाय, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी, टीसीएसचे शेअर दीड टक्क्यांहून अधिक घसरले.
ऑप्शन ट्रेडिंग करायचंय, मग लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; नुकसान होण्यापासून वाचाल अन् नक्कीच फायदा होईल
उच्चांकावरून शेअर बाजार कोसळला
सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ७५,००० अंकांची पातळी ओलांडली तर निफ्टीने लाइफ टाइम हाय गाठल्यानंतर सेन्सेक्सने अवघ्या १,४५० अंकांपेक्षा अधिकने खाली उडी घेतली ज्यामुळे या काळात बाजारातील गुंतवणूकदारांचे ७.५० लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जवळपास ३% घसरण झाली तर HDFC बँकेचा शेअर १.३० टक्क्यांघसरला ज्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरे कारण म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी ९६४ कोटी रुपयांच्या विक्रीचा सपाटा लावला तर तिसरे मोठे कारण म्हणजे सेन्सेक्सची आज एक्सपायरी डेट आहे.
IPO Files: आयपीओ येण्याआधीच प्रचंड क्रेझ, ग्रे मार्केटमध्ये जोरदार बोलबोला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार
गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा
दरम्यान, बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून BSE वरील सूचिबद्ध कंपन्यांचे मार्केट-कॅप सुमारे तीन लाख कोटींनी घसरून ४०५.९३ लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजे सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध शेअर्सच्या गुंतवणूकदारांना २.६७ लाख कोटींचा फटका बसला आहे.

Read Newest Industry Files

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दल

प्रियांका वर्तक

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.… आणखी वाचा

Read Extra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button