Stocks News

बाजारातील घसरणीत तुमचेही पसे बुडाले का? शेअर मार्केट कशामुळे पडतं अन् गुंतवणुकदारांनी काय करावं

Stock Market Wreck: स्टॉक मार्केट असे ठिकाण आहे जिथे लोक एखाद्या कंपनीतील हिस्सा किंवा शेअर्स खरेदी आणि विक्री करतात. तसेच, गुंतवणूकदार कॉर्पोरेट बाँड्स आणि म्युच्युअल फंड यासारख्या ठिकाणी शेअर बाजारातून पैसे गुंतवू शकतात. अलीकडेच शेअर बाजारात आलेल्या वादळाने बड्या-बड्या कंपन्या हादरले आणि शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले.

हायलाइट्स:

  • शेअर बाजारात बुधवारी मोठी पडझड पाहायला मिळाली
  • सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला
  • शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले
Why Section Market Wreck
शेअर बाजारात घसरण कशामुळे? गुंतवणुकदारांनी काय करावं?

मुंबई : शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात, पण तुम्ही कधी विचार केला का की मार्केट कशामुळे पडतं. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तेजी आणि मंदी सामान्य बाब आहे. बाजारातील घसरण आणि तेजीच्या बाबतीत तुम्ही अनेकदा ऐकले असेल, परंतु शेअर बाजारात मोठी घसरण किंवा मार्केट क्रॅश का होते? हे तुम्हाला माहित आहे का? शेअर बाजार क्रॅश आणि मार्केट घसरताना गुंतवणूकरांनी काय करावं याबाबत आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तथापि, सर्वप्रथम तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे की शेअर बाजार कार्य कसं करतं.

शेअर बाजाराच्या माध्यमातून लोक एखाद्या कंपनीतील हिस्सा (शेअर्स) खरेदी आणि विक्री करतात. तसेच, गुंतवणूकदार कॉर्पोरेट बाँड्स आणि म्युच्युअल फंड यासारख्या ठिकाणी पैसे गुंतवू शकतात. त्याच वेळी, कंपन्या व्यवसायावरील नियंत्रण न गमावता कंपनीचे शेअर्स या ठिकाणी विक्रीसाठी सूचीबद्ध करू शकतात. अतिरिक्त भांडवल उभं करण्यासाठी कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होतात.
Section Market Wreck: चांगलं चाललं होतं, आता अचानक कोसळला शेअर बाजार; गुंतवणूकदारांचे १३ लाख कोटी पाण्यात
शेअर्सच्या किमती का बदलतात?
शेअर बाजारातील व्यवहार अस्थिर असते, जिथे शेअर्सच्या किमतीत दररोज बदल होत असतात. पुरवठा आणि मागणीमुळे शेअर्सच्या किंमतीवर प्रभाव पडतो. शेअर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर भाव वाढतात. त्याउलट जर गुंतवणूकदारांनीं शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावल्यास किंमत घसरते. याशिवाय, कंपनीशी संबंधित सकारात्मक आणि नकारात्मक घडामोडींमुळेही चढउतार होत असतात.

शेअर बाजार का कोसळतो?

बिझनेसशी संबंधित घडामोडींव्यतिरिक्त अर्थव्यवस्था, महागाई दर, व्याजदर, जागतिक बाजार आणि जागतिक वित्त यांमुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत बदलते. वरील सर्व घटक बाजाराच्या विरोधात असेल तर बाजारात मोठी पडझड होते. म्हणजे बाजारात सूचीबद्ध बहुतेक कंपन्यांचे समभाग घसरतील आणि एक लाट निर्माण होऊ शकते, जी शेअर बाजार कोसळण्याचे कारण बनू शकते.
Stock Market: एनएसईने घेतला मोठा निर्णय, आता शेअर्सची खरेदी-विक्री करणे स्वस्त होणार
शेअर बाजाराच्या घसरणीत गुंतवणूकदारांनी काय करावं?

  • स्टॉक मार्केटमध्ये पडझड झाली तर सर्वप्रथम शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण घसरणारे शेअर्स खरेदी किंवा विक्री करून तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मात्र, जर स्टॉक बऱ्याच काळापासून घसरत असेल आणि तेजीची शक्यता नसेल तर अशा स्टॉकमधून बाहेर पडणे चांगले, अन्यथा पुढे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
  • गुंतवणूक केलेले शेअर्स होल्ड करून ठेवणे महत्त्वाचे असे. मार्केटच्या घसरणीला घाबरून शेअर्स विकल्यास नुकसान होऊ शकते.
  • एखाद्या घटनेमुळे बाजार घसरला तर पुन्हा तेजी येण्याचे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत अधिकाधिक शेअर्स खरेदी करून नफा मिळवू शकता.

Read Most unusual Replace Recordsdata

प्रियांका वर्तक

प्रियांका वर्तक यांच्याविषयी

प्रियांका वर्तक

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर मी कार्यरत आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात तब्बल ७ वर्षाचा अनुभव आहे. क्रीडा पत्रकारितेवर विशेष प्रभूत्व असून व्यापार क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड. भटकंतीसह बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाची विशेष आवड आहे.… Read Extra

Read Extra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button